"बॉस ७२-अवर रश" अंतर्गत ग्राहकांना खालील फायदे मिळणार आहेत:
1. बॉस प्राइसिंग: ओला एस१ एक्स २ केडब्ल्यूएचची किंमत ४९,९९९ रूपयांपासून (दररोज मर्यादित स्टॉक) सुरू होते.
2. बॉस डिस्काउंट्स: एस१ पोर्टफोलिओवर २५,००० रूपयांपर्यंत सवलत, तर एस१ प्रो मॉडेलवर ५,००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस.
3. बॉस फायदे: ८-वर्ष/८०,००० किमी बॅटरी वॉरंटी (किंमत ७,००० रूपये) मोफत, ज्यामुळे २५,००० रूपयांपर्यंत अतिरिक्त लाभ मिळतील.
4. बॉस फायनान्स ऑफर्स: निवडक क्रेडिट कार्ड ईएमआयवर ५,००० रूपयांच्या फायनान्स ऑफर्स.
5. बॉस बेनीफिट्स: ६,००० रूपये किमतीचे मूव्हओएस+ अपग्रेड आणि ७,००० रूपयांचे चार्जिंग क्रेडिट्स मोफत मिळणार.
ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या एस१ पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिले आहेत. प्रीमियम मॉडेल्समध्ये एस१ प्रो आणि एस१ एअर अनुक्रमे १,३४,९९९ रूपये आणि १,०७,४९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहेत, तर मास मार्केटसाठी एस१ एक्स पोर्टफोलिओचे (२ केडब्ल्यूएच, ३ केडब्ल्यूएच, ४ केडब्ल्यूएच) किंमती अनुक्रमे ७४,९९९ रूपये, ८७,९९९ रूपये आणि १०१,९९९ रूपये आहेत.
ओला इलेक्ट्रिकने #HyperService मोहिमेचीही घोषणा केली असून डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांच्या सर्विस नेटवर्कचा विस्तार १,००० केंद्रांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२५ पर्यंत कंपनी हे नेटवर्क १०,००० केंद्रांपर्यंत वाढवणार असून १ लाख थर्ड-पार्टी मेकॅनिक्सना ईव्ही सेवा देण्यासाठी प्रशिक्षित करणार आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये ‘संकल्प’ इव्हेंटमध्ये कंपनीने रोडस्टर मोटरसायकल सिरीज लाँच केली होती, ज्यात विविध तांत्रिक वैशिष्ट्यांसह रोडस्टर एक्स, रोडस्टर, आणि रोडस्टर प्रो मॉडेल्स समाविष्ट आहेत, ज्यांच्या किमती अनुक्रमे ७४,९९९ रूपये ते १,९९,९९९ रूपयांपर्यंत आहेत.
ओला इलेक्ट्रिकच्या 'बॉस ७२-अवर रश' मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:
1. किंमत: ओला एस१ एक्स २ केडब्ल्यूएच मॉडेल फक्त ४९,९९९ रूपयांत उपलब्ध (मर्यादित स्टॉक).
2. सवलत: एस१ पोर्टफोलिओवर २५,००० रूपयांपर्यंत सवलत; एस१ प्रोवर ५,००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस.
3. अतिरिक्त लाभ: ८-वर्ष/८०,००० किमी बॅटरी वॉरंटी आणि २५,००० रूपयांचे अन्य फायदे.
4. फायनान्स ऑफर्स: निवडक क्रेडिट कार्ड ईएमआयवर ५,००० रूपयांपर्यंत फायनान्स लाभ.
5. मुफ्त अपग्रेड्स: ६,००० रूपयांचे मूव्हओएस+ अपग्रेड आणि ७,००० रूपयांचे चार्जिंग क्रेडिट्स.
6. सर्विस नेटवर्क विस्तार: डिसेंबर २०२४ पर्यंत १,००० केंद्र, तर २०२५ पर्यंत १०,००० केंद्र होणार.
7. नवीन रोडस्टर सिरीज: रोडस्टर मोटरसायकल सिरीजची सुरुवात ७४,९९९ रूपयांपासून.
या मोहिमेमुळे ग्राहकांना ईव्ही खरेदीमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे.