'सिंघम अगेन' च्या टीमने स्विगीच्या सहकार्याने वडापावच्या सर्वात मोठ्या ऑर्डरची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली आहे. अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगीने रॉबिन हूड आर्मीच्या मुलांसाठी 11,000 वडापावची ऑर्डर दिली, ज्याचे वितरण मुंबईतील विविध शाळांमध्ये करण्यात आले.
या ऑर्डरचा समारंभ विलेपार्ले येथील एअरपोर्ट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झाला, जिथे अजय देवगण आणि रोहित शेट्टी(Rohit Shetty) उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे रॉबिन हूड आर्मीच्या मदतीने मुंबईच्या वांद्रे, जुहू, अंधेरी, मालाड आणि बोरिवलीतील शाळांमध्ये वडापावचे वाटप करण्यात आले.
रोहित शेट्टीने या विक्रमाबद्दल बोलताना म्हटले, "या वडापावच्या माध्यमातून मुलांना आनंद आणि जेवण दिल्याचा आनंद आहे."
चित्रपट 'सिंघम अगेन' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यात अजय देवगण (Ajay Devgan) पुन्हा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाची थीम "चांगले विरुद्ध वाईट" असून, त्यात करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण यांच्यासह टायगर श्रॉफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
दिवाळीत 'सिंघम अगेन'(Singham again) कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'ला टक्कर देणार आहे. 12 ऑक्टोबरला, टीमने नवी दिल्लीतील लवकुश रामलीला येथे भव्य रावण दहन केले, ज्यामुळे चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.