कोण होते बाबा सिद्दीकी?
बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले होते. त्यांची ओळख मुंबईतील काँग्रेसच्या एका प्रमुख अल्पसंख्याक चेहर्यांपैकी एक म्हणून होती. त्यांची राजकीय कारकीर्द 1980 च्या दशकात सुरू झाली. प्रारंभी त्यांनी युवक काँग्रेसच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. 1980 साली वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आणि पुढील चार वर्षांनी ते त्या गटाचे अध्यक्ष झाले.
राजकीय कारकीर्द
बाबा सिद्दीकी यांनी 1992 ते 1997 दरम्यान सलग दोन वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम केले. त्यांनी 1999, 2004 आणि 2009 या तीन निवडणुका जिंकून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यासारख्या महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता, आणि त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदांवर काम केले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर काम केले.
काँग्रेसमध्ये जवळपास ४८ वर्ष काम केल्यानंतर, २०२३ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठा बदल घडला होता.
बॉलिवूडशी असलेले संबंध
बाबा सिद्दीकी राजकारणात जितके प्रभावी होते, तितकेच त्यांचे बॉलिवूडशीही घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या इफ्तार पार्टीने नेहमीच चर्चेचा विषय बनवला. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती असायची, ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान यांसारखे आघाडीचे कलाकारही सामील असायचे. रमजानच्या काळात त्यांच्या इफ्तार पार्टीने बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील अनेक नामवंत व्यक्तींना एकत्र आणले.
ह. त्या आणि तिचा परिणाम
बाबा सिद्दीकी यांची हत्या हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे धक्का आहे. त्यांची निर्घृण हत्या कोणत्या कारणाने झाली याबद्दल अद्याप तपास सुरू आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.