या अफवांनंतर, गौरव आणि रितूने सोशल मीडियावर पोस्ट करत हे मान्य केले की त्यांच्या वैवाहिक नात्यात सध्या कठीण काळ आहे आणि त्यांनी नेटिझन्सकडून त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप न करण्याची विनंती केली.
मात्र, १९ ऑक्टोबर रोजी गौरवने आपल्या पत्नीसोबतचा एक आनंदी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि लोकांना त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये न शिरण्याचे आवाहन केले. या पोस्टसह त्याने लिहिले, "तुमच्या आईवडिलांनाही त्यांच्या नात्यात काही कठीण प्रसंग आले असतील आणि त्यांनी कदाचित ते तुमच्यासोबत शेअर केले नसेल. जेव्हा तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या नात्यात हस्तक्षेप करू दिला नाही, तर आम्ही का करू देऊ?"
या पोस्टसोबत गौरवने रितूसोबत कारमध्ये बसलेला आनंदी फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रितू सेल्फी घेत आहे. गौरवने निळा टी-शर्ट घातला होता, तर रितूने निळ्या टॉपवर बेज रंगाचा कोट घातला होता.
ही पोस्ट शेअर झाल्यानंतर लगेचच अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी याला PR स्टंट असे म्हटले. एकाने लिहिले, "सर्वांनाच माहिती आहे की हा एक पब्लिसिटी स्टंट होता." आणखी एका यूजरने लिहिले, "तुम्हाला एकत्र पाहून आनंद झाला, ट्रोलर्सकडे लक्ष न देता तुमचं आयुष्य एन्जॉय करा."
काही दिवसांपूर्वी, गौरवने दुर्गा पूजेतून आपल्या पत्नी आणि मुलगी कियारासोबतचे फोटो देखील शेअर केले होते, ज्यात त्यांनी "दुर्गा पूजा सेलिब्रेशन" (Durga Puja Celebrations) असं कॅप्शन दिलं होतं.