Dhanush Nayanthara legal notice: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकार धनुष आणि नयनतारामध्ये मोठा वाद उफाळला आहे. नयनताराच्या 'नयनतारा: बियॉंड द फेयरी टेल' या माहितीपटातील एका छोट्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअलवर धनुषने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या व्हिज्युअलमध्ये 'ननुम राउडी धन' चित्रपटातील गाणी आणि दृश्यांचा समावेश होता, ज्यासाठी नयनताराने धनुषकडून परवानगी मागितली होती. मात्र, धनुषने त्यास नकार दिला, आणि त्यानंतर डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर पाहिल्यानंतर व्हिज्युअल चोरीचा आरोप करत अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली.
या संदर्भात नयनताराने एक खुलं पत्र प्रकाशित करत धनुषच्या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रात तिने लिहिले, "तुझे वडील आणि भावामुळे तू यशस्वी अभिनेता बनला, पण चित्रपटसृष्टीत मला कोणताही गॉडफादर नव्हता. त्यामुळे मी संघर्ष करून आज स्वतःच चित्रपटसृष्टीत उभी आहे. माझ्या चाहत्यांना माझ्या कामाची माहिती आहे आणि ते माझ्या माहितीपटाची वाट पाहत आहेत, परंतु तुमच्या वृत्तीमुळे आमच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे."
नयनताराने पत्रात पुढे म्हटलं, "तुम्ही दोन वर्षे NOC ची वाट पाहत राहिलात आणि तोही मंजूर झाला नाही. त्यामुळे आम्ही डॉक्युमेंटरीला पुन्हा संपादित करू. ज्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअलसाठी तुम्ही 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्यावर न्यायालयच अंतिम निर्णय घेईल. आम्ही याला कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ."
नयनताराने अशा प्रकारे धनुषच्या आक्षेपांना विरोध करत, त्याच्या अहंकारावरही टीका केली. तिने म्हटलं की, "तुम्ही सांगितले होते की 'ननुम राउडी धन' चित्रपटाच्या यशामुळे तुमचा अहंकार दुखावला गेला आणि तुम्हाला तो स्वीकारणे कठीण झालं."