सध्याच्या काळात मोबाईल रिचार्ज प्लॅन निवडणे हे ग्राहकांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. टॅरिफ दर वाढल्याने ग्राहक कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे देणारे प्लॅन शोधत आहेत. अशा परिस्थितीत, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रिचार्ज प्लॅन्सची तुलना करून पैसे वाचवण्याचे प्रयत्न ग्राहक करत आहेत. या लेखात, रिलायन्स जिओ आणि BSNL यांच्या किफायतशीर आणि फायद्याच्या दोन खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत.
रिलायन्स जिओचे 198 रुपये आणि 949 रुपये रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचे 198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2 GB डेटा मिळतो, ज्यामुळे एकूण 28 GB डेटा उपलब्ध होतो. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस करण्याची सुविधा देखील दिली जाते. विशेष म्हणजे, प्लॅनमध्ये दैनंदिन डेटा संपल्यास उपलब्ध भागात 5G नेटवर्कच्या माध्यमातून अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते, ज्यामुळे ग्राहकांना इंटरनेटचा संपूर्ण वापर करता येतो.
949 रुपयांचा दुसरा प्रीपेड प्लॅन जिओकडून 84 दिवसांच्या वैधतेसह सादर केला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस आणि Disney+ Hotstar चा मोफत सबस्क्रिप्शन मिळतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 5G सेवा असलेल्या भागात अमर्यादित इंटरनेटचा लाभ घेता येतो. हा प्लॅन विशेषतः OTT सेवांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतो.
BSNL चा स्वस्त आणि दीर्घकालीन प्लॅन
रिलायन्स जिओच्या प्लॅनसारखाच एक आकर्षक प्रीपेड प्लॅन BSNL ने सादर केला आहे. या प्लॅनची किंमत कमी असून त्याची वैधता 160 दिवस म्हणजे जवळपास पाच महिने आहे. यात दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा दिली जाते. जिओच्या प्लॅनच्या तुलनेत BSNL च्या प्लॅनमध्ये अधिक दिवसांची वैधता असल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी जिओ आणि BSNL चे हे प्रीपेड प्लॅन्स अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. जिओचे प्लॅन कमी कालावधीसाठी असले तरी डेटा आणि OTT सुविधांसह त्यात विविध फायदे मिळतात. दुसरीकडे, BSNL चा प्लॅन जास्त कालावधीसाठी असल्याने त्याचा वापर कमी खर्चात जास्त काळ केला जाऊ शकतो.