Maharashtra 10th 12th exam 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वर्षी परीक्षा नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा दहा दिवस अगोदर घेतल्या जाणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४पासून सुरू होईल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल. परीक्षांचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना आगामी तीन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे.

परीक्षेचे नवीन वेळापत्रक:
(Maharashtra HSC SSC exam dates)

बारावी (प्रात्यक्षिक परीक्षा): २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

बारावी (लेखी परीक्षा): ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

दहावी (प्रात्यक्षिक परीक्षा): ३ ते २० फेब्रुवारी

दहावी (लेखी परीक्षा): २१ फेब्रुवारी ते १७ मार्च


सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली परीक्षा:

परीक्षेतील गोंधळ आणि कॉपीची समस्या टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत लागू करण्यात येणार आहे. यामुळे परीक्षेचे पारदर्शक आयोजन होईल आणि विद्यार्थ्यांना योग्य वातावरणात परीक्षा देण्याची संधी मिळेल.(Maharashtra SSC HSC exam updates)

परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलांचे कारण:

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस अगोदर जाहीर केले असून, यामुळे विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि इतर प्रवेश परीक्षा तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. तसेच, यामुळे परीक्षेचा निकालही १५ ते २० दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले:

परीक्षेची तयारी करतांना नियमितपणे पेपर सोडवण्याचा सराव करा.

- पोषक आहार घ्या आणि मोबाइलपासून दूर राहा.

- रात्री जागरण टाळा, तसेच शिळे अन्न न खा.

- तासनतास एकाच ठिकाणी बसण्याऐवजी थोडे विश्रांती घ्या.

- थोड्या मनोरंजनाच्या वेळेसोबतच कठोर अभ्यास करा.

ऑनलाइन वेळापत्रक तपासण्यासाठी: विद्यार्थी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात.

यंदाच्या बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असतील, आणि योग्य तयारी केल्यास ते उत्तम यश मिळवू शकतील.