इंग्लंडने प्रथमता मॅचची सुरुवात चांगली केली. 45 धावांवर इंग्लंड बिनबाद होता. मात्र पुढील 111 धावांमध्ये संपूर्ण संघ पॅवेलियनमध्ये परतला. आणि श्रीलंका क्रिकेट टीमसमोर केवळ 156 धावांचं लक्ष ठेवलं. इंग्लंडच्या बाजूने खेळत असताना बेन स्टोक्सने 73 चेंडू मध्ये 43 धावा केल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टो त्याने तीस धावा केल्या. तर डेव्हिड मला ने 28 धावा केल्या. यांच्यानंतर मात्र श्रीलंकेने विकेटची लाईनच लावली. मोईन अली याने 15 धावा केल्या. तर डेव्हिड विली याने 14 धावा केल्या.
श्रीलंकेकडून गोलंदाजी करत असताना लाहारु कुमारा याने 35 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर कसून रजिथा याने 36 धावा देत दोन विकेट घेतल्या. या मॅच मधून पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज याने 14 धावा देत दोन विकेट घेतल्या. महेश थीक्षणा याने एक विकेट घेत 21 धावा दिल्या.
केवळ 156 धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंका हे पहिल्यांदा हालली. यामध्ये कुशल परेरा केवळ चार धावा केला तर मेंडिस याने 11 धावा करत डेव्हिड विलीच्या बॉलवर आउट झाले. त्यानंतर आलेले सदीरा समरविक्रमा आणि पथूम निसंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी 137 धावा करत श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. यासाठी त्यांनी 122 चेंडू वापरले. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मॅच मध्ये श्रीलंकेने 25.4 ओव्हर मध्ये 160 धावा करत असताना दोन विकेट दिले होते.
समरविक्रमा सात चौकार आणि एक षटकार मारत 65 धावांवर नाबाद राहिला यासाठी त्यांनी 54 चेंडू वापरले. तर निसंका 83 चेंडू वापरत दोन षटकार आणि सात चौकार मारत 77 धावांवर नाबाद राहिला.
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ पाच विजय मिळवत 10 गुणांसह सध्या पॉईंट टेबलवर आघाडीवर आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट टीमचे संघ आठ गुणांसह दोन नंबर आणि तीन नंबर वर आहेत. पॉइंट टेबल मध्ये चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ सहा गुणांसह आहे. बाबर आज़मचा पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ चार गुणांसह अजून देखील शर्यतीमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड बांगलादेश आणि नेदरलँड यांना पाच पैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे त्यामुळे त्यांचे आव्हान आता संपुष्टात आल्यात जमा आहे. मात्र ते आता इतरांचे गणित बिघडवण्यामध्ये हातभार लावू शकतात.
icc world cup 2023: श्रीलंकेने विजय मिळवल्यामुळे नेट रन रेट मध्ये सुधारणा करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आता त्यांचा नेट रन रेट -०.२०५ आहे. रन रेट सुधारल्यामुळे पाकिस्तान(पाकिस्तान लाइव स्कोर) सहाव्या क्रमांकावर गेला आहे आता पाकिस्तानचा रन रेट -०.४०० आहे. तर इंग्लंड क्रिकेट टीमचा नेट रन रेट खूपच खाली गेला आहे त्यामुळे ते सध्या पॉईंट टेबल मध्ये नव्या क्रमांकावर दिसत आहेत. इंग्लंडचा सध्याचा नेट रन रेट -१.६३४ आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान(afghanistan world cup 2023) हे त्यांच्या पुढे आहेत या दोघांचा रन रेट अनुक्रमे -१.२५३ व -०.९६९ आहे. श्रीलंका क्रिकेट टीमला आता येणाऱ्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तान, भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा सामना करायचा आहे. येणारे चार सामने सलग जिंकल्यास त्यांना सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे.