महाराष्ट्रात निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळून ही पूर्ण पाठींबा नसल्यामुळे भाजपा अजून सत्ता स्थापन करू शकली नाही तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पद 50:50 प्रमाणे देण्यावरून वाद सुरू असताना तिकडे पुण्यात कोंढवा भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटे असलेला पोस्टर लावण्यात आला आहे. या पोस्टरची चर्चा प्रथम पुण्यात झाली आणि आता सोशल मीडिया मुळे अख्या महाराष्ट्रात होत आहे.


फेसबुक/


मावळत्या विधानसभेचा कालावधी आज संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमास अनुसरून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील.

Amazing Deal for you!
_Mid Top Lace Up Sneakers_
~Rs.2599.0~ *Rs.1300.0*

BUY NOW ON NNNOW


या सगळ्या घडामोडी एकीकडे होत असताना तिकडे पुण्यातील कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेला डिजिटल लावलेला असून त्यावर "महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…!" असा आशय असलेला मजकूर छापलेला असल्याने सर्वांचे लक्ष या फ्लेक्स कडे जात आहे.

मराठी मध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट कसे तयार करावे | How to Create Blog/Website on Blogger Complete Guide in Marathi क्लिक करा



निवडणूक प्रचारात एकमेकांना विरोध करणारे आता एका पोस्टर वर पाहून पाहणारे लोक सुद्धा अचंबित होत आहेत. या पोस्टर वरून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येईल का असा प्रश्न सामन्यांना पडला आहे...

नवा व्हिडीओ केला जारी | सोनी टीव्ही ने मागितली माफी🙏 | छत्रपती शिवाजी महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख >> क्लिक करा