'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही लोकप्रिय छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. हे कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक फक्त महाराष्ट्रात व देशातच नाही तर पूर्ण जगभरात आहेत. त्या कार्यक्रमातील कलाकार मंडळी गेले कित्येक वर्षापासून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा काम करत आहेत. या कार्यक्रमाद्वारे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. तसेच या कलाकारांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील अशीच एक लोकप्रिय कलाकार म्हणजेच वनिता खरात ही आहे.
आपला अभिनयाची छाप अभिनेत्री वनिता खरात ने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील उमटवली आहे. वनिता खरात ने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केला आहे. एका लोकप्रिय मालिकेत वनिता खरात ची जबरदस्त अशी एंट्री होणार आहे.
वाचा आणखी:
"सुंदरी"(sundari) लोकप्रिय मालिका 'सन मराठी' वाहिनीवर दिसत असून या मालिकेत अनिता खरात झळकणार आहे. या मालिकेत वनिता एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सन मराठीच्या सोशल मीडिया पेजवर याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत वनिताचा अंदाज एकदम डॅशिंग असा दिसणार आहे.
अभिनेत्री वनिता खरात हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने यादी अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'एकदा येऊन तर बघा'(ekda Yeun tr bga) या चित्रपटात देखील ती झळकणार आहे.हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील अनेक कलाकार देखील बघायला मिळणार आहेत. यामध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी ,नम्रता सबेराव ,भाऊ कदम ,तेजस्विनी पंडित ,ओंकार भोसले शशिकांत केरकर ,राजेंद्र शिसातकर ,विशाखा सुभेदार ,रोहित माने, आणि सुशील इनामदार असे तगडे कलाकारांची मांदियाळी आहे.
आणखी वाचा: